Subscribe Us

header ads

सेवानिवृत्तीपर प्रा.अशोक डोईफोडे यांचा सपत्नीक सत्कार. Prof.Ashok Doifode along with his wife felicitated on retirement.

गडचांदूर:-News@सत्कार..
      महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर येथील एमसीव्हीसी MCVC विभागाचे प्रमुख प्रा. "अशोक डोईफोडे" यांचा सेवानिवृत्तीपर  31 मार्च रोजी संस्था व कनिष्ठ महाविद्यालयतर्फे शाल, श्रीफळ,पुष्पगुच्छ,साडी व भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष आमदार सुभाष धोटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले,गडचिरोली गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक तथा संस्थेचे संचालक डॉ.अनिल चिताडे,संस्थेचे उपाध्यक्ष राहुल बोढे,प्रभारी सचिव धनंजय गोरे,संचालक विठ्ठलराव थिपे,विकास भोजेकर,रामचंद्र सोनपितरे,श्रीमती उज्वला धोटे, विमाशीचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे,माजी जिल्हापरिषद सदस्य अरूण निमजे,नगरसेवक पापय्या पोन्नमवार,नगरसेवक तथा गटनेता विक्रम येरणे,माजी न.प.उपाध्यक्ष सचिन भोयर, सेवानिवृत्त प्रा,अशोक डोईफोडे,सौ.प्रभाताई डोईफोडे,प्राचार्य रामकृष्ण पटले होते.
             प्रा.अशोक डोईफोडे यांनी या कनिष्ठ महाविद्यालयात एकूण 33 वर्षे 4 महिने 5 दिवस अशी प्रदीर्घ काळ सेवा केली.प्रा.डोईफोडे यांचे शैक्षणिक,सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण असून विवीध प्रकारच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांचे बहुसंख्य विद्यार्थी आज घडीला रोजगार, स्वयंरोजगार करीत आहे.सत्काराला उत्तर देताना प्रा.डोईफोडे यांनी संस्था व महाविद्यालयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत दिलेले प्रेम कधीही विसरणार नाही असे भावनिक मत व्यक्त केले.
           प्रा.आरजू आगलावे यांनी परिचय करून दिला,प्रास्ताविक प्राचार्य स्मिता चिताडे,संचालन प्रा.आशीष देरकर तर आभार प्रदर्शन प्रशांत धाबेकर यांनी व्यक्त केले.सदर कार्यक्रमात सेवानिवृत्त मुख्याधिकारी तथा तहसीलदार भगवंतराव डोईफोडे,नगरपरिषद देऊळगाव राजाचे सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी गजानन डोईफोडे,प्राचार्य साईनाथ मेश्राम,प्राचार्य हनुमंते, सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनूरवार, उपमुख्याध्यापक अनिल काकडे,उपप्राचार्य प्रफुल्ल माहुरे तसेच प्राध्यापक,विविध शाळेचे शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.
Prof.Ashok Doifode along with his wife felicitated on retirement...
                          ---------//--------
                         
                      मुख्यसंपादक
                    सै.मूम्ताज़ अली.
    मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या