Subscribe Us

header ads

Security guard killed in tiger attack.वाघाच्या हल्ल्यात सुरक्षा रक्षकाचा मृत्यू.

News@Tiger attack...
         चंद्रपूर जिल्ह्यातील मूल मार्गावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोन Tadoba Tiger Project Buffer Zone अंतर्गत येणाऱ्या लोहरा जंगलात एका पट्टेदार वाघाच्या हल्ल्यात पुरूषोत्तम बोपचे वयवर्ष 40 हा व्यक्ती ठार झाल्याची घटना 28 एप्रिल रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास उघडकीस आली.इंदिरा नगर येथील रहिवासी पुरूषोत्तम स्थानिक एमईएल पोलाद कारखान्यात MEL Steel Factory सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.सकाळी हा वन फुले वेचण्यासाठी लोहारा जंगलात गेला होता.दुपार झाली तरी घरी तो परतला नाही म्हणून पत्नीने घरा शेजारी पतीच्या मित्रासोबत शोधाशोध सुरू केली.जंगलात येऊन बघितले असता त्याचा मृतदेह मिळाला.चंद्रपूर जिल्ह्यातील विवीध भागात सतत वाघ,बिबटचे हल्ले सुरू असून यामध्ये निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात आहे.संबंधित विभागाने समाधानकारक उपाययोजना करण्याची मागणी आहे.
Security guard killed in tiger attack...
                           --------//-------
                       
                    मुख्य संपादक
                  सै.मूम्ताज़ अली.
    मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या