Subscribe Us

header ads

'ते' विधान “सावकरांच्या त्या पुस्तकात दाखवा?" Show 'that' statement in that book.

News@Challenge...
     "बलात्कार हे राजकीय हत्यार आहे,ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा" असे विधान स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी एका पुस्तकात केल्याचा दावा काँग्रेसचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार Shivani Vadettivar.यांनी नुकताच केला होता.आता त्यांच्या या विधानाचा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू  "सात्यकी सावरकर" Satyaki Savarkar यांनी समाचार घेतला आहे.“सहा सोनेरी पाने’' या पुस्तकात हे विधान मला दाखवावे,असे थेट आव्हान challenge त्यांनी वडेट्टीवारांना दिले आहे. “शिवानी वडेट्टीवार यांनी केलेलं विधान अत्यंत चुकीचे असून सावरकरांनी असे कुठलेही वाक्य त्या पुस्तकात लिहिलेले नाही.त्यांनी ते विधान मला दाखवावे,असे कोणतेच वाक्य पुस्तकात नाही. "सहा सोनेरी पाने" ही पुस्तक मी वाचलेली आहे,असे सात्यकी सावरकर यांनी एका वाहिनी सोबत बोलताना सांगितले.Show 'that' statement in that book.Satyaki Savarkar direct challenge to Shivani Vadettivar.
या मुद्यावर सविस्तर बोलताना सात्यकी सावरकर म्हणाले की,स्वा.सावरकरांना काँग्रेसकडून मुद्दाम लक्ष्य केले जात आहे.एकतर त्यांनी अभ्यास केलेला नाही,पूर्ण वाचलेले देखील नाही,त्यांचे सल्लागार मंडळ सांगते त्याप्रमाणे ते बोलत असतात.स्वतः पडताळून पाहण्याचे कष्टही ते घेत नाही,अशी टीकाही त्यांनी केली.स्वातंत्र्यवीर सावरकर हे हिंदुत्ववादी नेते होते,राज्यात हिंदुत्ववादी सरकार आले,काँग्रेसची सत्ता गेलेली आहे,सत्ता मिळवायचे प्रयत्न सुरू आहे,अशी टीकाही त्यांनी केली.
Show 'that' statement in that book...
Satyaki Savarkar direct challenge to Shivani Vadettivar...
                           --------//--------
                         
                    मुख्यसंपादक
                  सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या