Subscribe Us

header ads

गोष्ट इंग्लंडच्या बिबरी गावाची. The story of Bibury village in England..

News@Korpanalive...
         आमच्या चटप परिवाराचं मूळ गाव म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातील चिखली.त्याआधी मांगली गावात वास्तव्य होतं असे जूनी मंडळी सांगतात. माझं बालपण लखमापुर गावातलं.गाव हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय.सामाजिक जीवन जगणारी,एकमेकांच्या मदतीला धावून जाणारी आणि आपुलकी जपणारी माणसं गावात असतात.बालपणी आमच्या शेतातील वांगी, मिरची,कांदे आदी सायकलने गावात फिरून विकण्याची मजा विसरुच शकत नाही.कंच्या, लगोरी, खो-खो हे आवडते खेळ. “अति उच्चत्म जीवन बने,परमार्थमय व्यवहार हो,ना हम रहें अपने लिए,हमको सभी से गर्ज है,” या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ओळी Lines of Rashtrasant Tukdoji Maharaj आणि गावातील सामूदायिक प्रार्थनेतील मानवतावादी भजने आजही कानात गुंजतात.इंग्लंड England ला आल्यानंतर मी लंडन शहरात राहतो आहे.या शहरातील गगनचुंबी इमारती,ऐतिहासिक वास्तु आणि विद्यापीठं बघितली.स्वच्छ रस्ते, सुटाबुटातीली माणसं आणि भौतिक विकासाच्या बाबतीत माझ्या गावापेक्षा शेकडो वर्ष पुढे असलेलं हे शहर.मात्र किती ती स्पर्धा,जगण्याची धावपळ आणि माणसा-माणसात अंतर वाढविणाऱ्या या शहरात ‘गावपण’ मला जाणवलं नाही.इंग्लंड देशातील गाव कसं असेल ? इथल्या गावातील घरं,माणसे व प्रशासन कसं आहे ? या प्रश्नांबाबत कुतूहल मनात होतं.मागच्या महिन्यात डॉ.नानासो थोरात,समीर आठल्ये,राहुल आसनिकर,डॉ.ऋषी या मित्रांसमवेत इथल्या एका गावात जाण्याचा बेत ठरला.इंग्लंडचे बिबरी Bibury हे गाव बघितले.लंडनपासून कारने by car 2 तास अंतरावर असलेले बिबरी गाव मला कसं वाटलं,हे तुमच्याशी शेअर करतो आहे.The story of Bibury village in England..
        बिबरी हे गाव दगडी घरांसाठी प्रसिद्ध आहे. Biburi village is famous for its stone houses.यातील काही घरांना अर्लिंग्टन रो Arlington Row म्हणून ओळखले जाते. मध्ययुगात वुलन Woolen(लोकर)व्यवसायाचे केंद्र असलेले हे गाव 13 व्या शतकात मोठे वुलन केंद्र असलेल्या या गावात अनेक विणकर Weaver work काम करायचे.पुढे या केंद्राचे घरांत रूपांतर केले गेले.13 व्या शतकातील काही घरांचे आजही संवर्धन केले गेले आहे,हे विशेष. औद्योगिकरणा आधी शेती,मेंढीपालन व लोकर विणकाम हा गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय होता. आता पर्यटन,गिफ्ट्स दुकानं आणि सेवा क्षेत्राकडे (सर्विस सेक्टर)गाव वळले आहे.या गावात जवळपास 40 घरं,2 हॉटेल्स,1 बगीचा,1 चर्च आणि छोटीशी कोलन नदी Colon River दिसली.शांत,स्वच्छ आणि कमी लोकवस्तीचे हे गाव.अवघ्या काही वेळात गावाचा 1 फेरफटका मारला.गावातील बहुतांश लोक शहरात स्थायिक झाले असून इथले घरं हे पर्यटकांना किरायाने दिली जातात.शहरातील लोकं गावातील जगणं अनुभविण्यासाठी इथे येऊन राहतात.गावातील रस्ते लहान वाटली.गावातील माणसांच जीवन एकाकी दिसलं.गावं म्हटलं तर एखाद्या ठिकाणी 5,10 लोक पारावर एकत्रित येऊन गप्पा मारतात, किंवा गायी-म्हशीचा हंबरडा कानावर येतो,असे काही इथे दिसले नाही. 
        आपल्याकडे गावातील प्रशासकीय काम हे ग्रामपंचायत मधून होतात.इथे बिबरी पॅरिश कौन्सिल Bibury Parish Council आहे. गावातील जूजबी कामांचे बजेट आखणे,रहिवास कर नियंत्रण,स्थानिक कार्यक्रम आयोजित करणे, यासह गावातील विविध सुविधांवर देखरेख करण्याची जबाबदारी कौन्सिल Council वर असते.इथल्या कोणत्याच निवडणुकीत इव्हीएमचा वापर होत नाही.EVMs are not used in elections.निवडणुका बॅलेटवर होतात. Elections are held on ballots.कौन्सिल ही निवडून आलेल्या सदस्य वअध्यक्षांची बनलेली असते.आपल्याकडील सरपंचाप्रमाणे इथे कौन्सिल अध्यक्ष पद असते.सदस्यांचा कार्यकाळ 4 वर्ष असतो.The tenure of members is 4 years.गावकरी सदस्यांची निवड करतात आणि हे सदस्य एका अध्यक्षाची निवड करतात.या अध्यक्षांचा कार्यकाळ 1 वर्ष असतो.इथे जनतेतून थेट अध्यक्षाची निवड केली जात नाही.कवी इंद्रजीत भालेराव आपल्या गावांचे वर्णन करताना लिहितात की, “काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता, माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता,कशी ऊन्हात तळतात माणसं,कशी मातीत मळतात माणसं, कशी खातात जीवाला खस्ता,माझ्या गावाकडं चल माझ्या दोस्ता..” इंग्लंडचे बिबुरी हे गाव मात्र डांबरी रस्ते,बाग-बगीचे,शहरातील लोकांच्या पर्यटन-विरंगुळ्याचे केंद्र वाटले.
                        "ॲड.दीपक चटप"
                         लंडन(5.4.2023)
The story of Bibury village in England...
Adv.Deepak Chatap...
                         --------//--------
                      
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
  मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या