Subscribe Us

header ads

अंगणात झोपलेल्या महिलेवर वाघाचा हल्ला.A tiger attacked a woman sleeping in the yard.

New@Tiger attack...
            चंद्रपूर जिल्ह्यातील सावली वनपरिक्षेत्र अंतर्गत व्याहड खुर्द उपवन परिक्षेत्रातील विरखल चक येथील मंदा सिडाम वयवर्ष 53,ही काल रात्रीच्या सुमारास घराच्या अंगणात खाटेवर झोपलेली असताना एका वाघाने रात्री अंदाजे 1 ते 2 च्या सुमारास खाटेवरून उचलून जंगलाच्या दिशेने ओढत नेले आणि ठार केले.दरम्यान लोकांनी आरडाओरड करत त्या दिशेने धाव घेतली.वाघ निघून गेला परंतु महिलेचा मृत्यू झाला होता.या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असून आम्ही गावात राहात आहो की, जंगलात असा प्रश्न निर्माण झाल्याची भावना व्यक्त होत आहे.सावली वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील क्षेत्र असून या परिसरात वाघ व बिबट,यांचा मोठ्याप्रमाणात वावर आहे.वारंवार होत असलेल्या हल्ल्यातून जाणारे बळींची संख्या पाहता वनविभागा विरूद्ध संतापाची लाट पसरल्याचे चित्र आहे.A tiger attacked a woman sleeping in the yard.
           आजपर्यंत जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात मोठ्याप्रमाणात निष्पाप नागरिकांचे बळी गेला असून यामध्ये एकट्या सावली तालुक्यात एक तृतीयांश पेक्षा जास्त बळी हे,सावली तालुक्यात गेले आहे.ही बाब अतिशय गंभीर असताना शासनचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.मागील आठवड्यात बोरमाळा येथील 5 वर्षीय चिमुकल्या मुलाचा वाघाने बळी घेतला.वारंवार होत असलेल्या अशाप्रकारच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे बळी जात आहे.! याविषयी शासन-प्रशासन समाधानकारक उपायोजना करणार तरी कधी ? असा संतापजनक प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.या नरभक्षक वाघांचा लवकरात लवकर बंदोबस्त करा,अन्यथा आगामी काळात नागरिक शासना विरोधात आंदोलन उभारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.?
A tiger attacked a woman sleeping in the yard...
                       ---------//--------
                     
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या