Subscribe Us

header ads

राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी काळी मातीचा वापर योग्य की अयोग्य.?Use of black soil for national highway work is right or wrong.?

गडचांदूर:-@National Highway...
   चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा-आदिलाबाद 930 B, या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला दिवसेंदिवस गती प्राप्त होताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर रस्ता खोदकाम करून त्याठिकाणी मुरूम टाकण्या ऐवजी काळी माती टाकली जात आहे.हायवेच्या कामात काळ्या मातीचा वापर योग्य की अयोग्य ? असा प्रश्न पडला असून यासंदर्भात जनतेत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे.कारण की, यापुर्वी भोयगाव-गडचांदूर मार्गावर सिमेंट काँक्रिट रोडचे काम झाले आणि पुढे पाटण पर्यंत हे काम होणार असल्याचे कळते.रोडचे काम मजबूत होत नसल्याने अंदाजे 6,7 फुट येथील काळी माती खोदून यामध्ये दुसरे मटेरियल भरण्यात आले. येथील शेकडो ब्रॉस खोदलेली काळी माती ठेकेदाराच्या संबंधित व्यक्तीने गरजू लोकांना विकून लाखो रूपये कमवले.तेव्हा विचारणा केली असता काळी माती यासाठी योग्य,सुटेबल Suitable नाही,यासाठी ही काळी माती काढावी लागते,असे सांगण्यात आले.परंतू आता नव्याने राजूरा-आदिलाबाद राष्ट्रीय महामार्गाचे New Rajura-Adilabad National Highway काम सुरू आहे,त्यासाठी खोदलेले खड्डे भरण्यासाठी काळी माती वापरण्यात येत आहे.
        एका रोडच्या कामासाठी काळी माती योग्य Suitable आहे,आणी दुसऱ्या रोडच्या कामासाठी काळी माती योग्य नाही का ? ही तफावत पाहून जनतेत संभ्रम निर्माण झाला आहे.राजूरा-अदिलाबाद रोडसाठी काळी माती योग्य असेल तर भोयगाव गडचांदूरवरील रोडवर सुद्धा काळी माती सुटेबल असायला हवी होती.असे नसेल तर निव्वळ पैसा कमविण्यासाठी भोयगाव-गडचांदूर रोडच्या कामाची काळी माती विक्री केली गेली नाही ना ? असे प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे.एकच शहरात 2 काम सुरू असून एका ठिकाणी काळी मातीचा वापर,तर दुसर्‍या ठिकाणी काळी माती सुटेबल,योग्य नाही म्हणून विक्री करून लाखोंची कमाई ? ही तफावत पचणी पडत नसून सदर प्रकणी संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी सर्वसामान्य जनतेकडून करण्यात आली आहे.
New Rajura-Adilabad National Highway...! 
Use of black soil for national highway work is right or wrong...?
                       -----------//----------
                        
                      मुख्यसंपादक
                    सै.मूम्ताज़ अली 
    मो.9595630811,9049358699.0

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या