Subscribe Us

header ads

Vadgaon student selected for ISRO tour. वडगावच्या विद्यार्थ्याची इस्त्रो दौऱ्याठी निवड..

News@Korpanalive...
            कोरपना पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव Vadgaon येथे इयत्ता 6 व्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी "साहिल पुंडलिक उरकुडे" याची जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत इस्त्रो ISRO(भारतीय अंतराळ संशोधन संस्था) Indian Space Research Organisation बेंगळूरू Bangalore येथे अभ्यास दौऱ्यासाठी निवड झाली आहे.Vadgaon student selected for ISRO Tour.25 एप्रिल ते 29 एप्रिल या कालावधीत हा दौरा असणार असून साहिलला या दौऱ्यासाठी पाठविण्यात आले आहे.
         जिल्हास्तरावर झालेल्या नवरत्न स्पर्धेमध्ये साहिलने प्रथम क्रमांक मिळवल्यामुळे ही संधी त्याला प्राप्त झालेली आहे.याप्रसंगी त्याला कोरपना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रूपेश कांबळे व केंद्रप्रमुख विलास देवाळकर यांनी तसेच शाळेचे उच्च श्रेणी मुख्याध्यापक सखाराम परचाके,विषय शिक्षक वसंत गोरे, शिवाजी माने सहाय्यक शिक्षक सुरेश टेकाम अनिल राठोड,काकासाहेब नागरे व नितीन जुलमे यांनी साहिलचे पुष्पगुच्छ व पुष्पहाराने अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या आहे.तसेच ग्रामपंचायत वडगावच्या सरपंचा स्मिता किनाके, उपसरपंच सुदर्शन डवरे,समस्त ग्रामपंचायत सदस्य,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्रीराम पाचभाई,उपाध्यक्षा वनिता पिंपळकर व समस्त सदस्य यांनीही साहिलचे अभिनंद व कौतुक केले आहे.साहिल प्रमाणेच इतरही विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेऊन यश संपादन करावे असे मौलिक आवाहन मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
Vadgaon student selected for ISRO tour...
                         --------//--------
                        
                    मुख्यसंपादक
                  सै.मूम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या