Subscribe Us

header ads

मतदारांची पसंती "सर्कलच्या व्यक्तीला की,इतर ठिकाणच्या नवख्याला ?" Voters' preference is the candidate of the circle or the newcomer from other places.?

New@Z.P.Election वार्तापत्र...!
        मिनी मंत्रालय Mini Ministry समजल्या जाणाऱ्या जिल्हापरिषदेत Z.P. सध्या प्रशासक बसले आहे.काही कारणास्तव जिल्हापरिषदेची Zilla Parishad निवडणुक लांबणीवर पडत असताना आता लवकरच तारखा जाहीर होण्याचे भाकीत काही राजकीय नेत्यांनी वर्तवले आहे.याच पार्श्वभूमीवर जवळपास सर्वच राजकीय पक्ष नेत्यांनी कंबर कसली आहे.आरक्षण,तारखा जाहीर होण्याची प्रतिक्षा असून एकदा हे जाहीर झाले की,मग पहा मज्जा. "कोण कितने पानी मे" हे त्यावेळी कळेल ? सध्या निवडणुकीच्या रणधुमाळीला Election battle सुरूवात व्हायची असताना तालुक्यात काही अतिउत्साही, स्वयंघोषित,संधीसाधू नेत्यांना आतापासूनच जि. प.पं.स.चे डोहाळे लागल्याचे दिसते. "यांचं काही खरं नाही रे बाबा" अशी उपहासात्मक चर्चा या निमित्ताने ऐकायला मिळत आहे.बरेचदा पक्ष संघटन सर्कलच्या इच्छुक उमेदवाराला डावलून इतर ठिकाणच्या नवख्या व्यक्तीला उमेदवारी देतात.वास्तविक पाहता सर्कलमध्ये राहणारा, सर्कलच्या लोकांची ओळख असलेला,24 तास नजरे समोर राहणाऱ्या संयमी,स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला उमेदवारी देणे हिताचे,अर्ध्या रात्रीही जर काम पडले तर भेटू शकतो,वेळेवर इतर ठिकाणच्या उमेदवाराला कुठे शोधायचं,असे काही मतदार आणि राजकीय विश्लेषकांचे मत आहे. Voters' preference is the candidate of the circle or the newcomer from other places.?
  कोणत्याही पक्षाने उमेदवारी देताना स्थानिकांना प्राधान्य देण्याची गरज आहे.नाही तर "स्थानिक राहिले धुऱ्यावर,इतरचे नवखे बसले माऱ्यावर" असे व्हायला नको,अन्यथा बट्ट्याबोळ झालाच समजा ? अशी चर्चा तालुक्यात ठिकठिकाणी सुरू आहे.आता काळ बदलला भाऊ,लोक हुशार झाले आहे,कोण कामाचा,कोण बिनकामाचा, याची तुलना करतात,बोटावर मोजण्या इतक्या कार्यकर्त्यांच्या जिवावर उड्या मारणारे,निवडणूक आली की सहानुभूती दाखवणारे भरपूर असतात. ? याउलट स्थानिक पातळीवरील समस्यांची जाणीव असलेला,लोकांच्या सुखदुःखात आपुलकीने सहभागी होणारा,जनतेच्या सेवेसाठी धावून जाणाऱ्या व्यक्तीला जनता पहिली पसंती देतात,हे वास्तव नाकारता येत नाही.मुखवटे घालून येणार्‍यांचा डोंगा कसा बुडवायचा,हे आम्हाला बरोबर ठाऊक आहे.शेवटी "ये तो पब्लिक है,ये सब जानती है" असे मत काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे.सध्याच्या परिस्थितीत जि.प.व पं.स.साठी सर्व पक्ष तयारीत असून फक्त तारखा व आरक्षण जाहीर होण्याकडे लक्ष लागले आहे.निवडणूकांबद्दल कोणत्या ठिकाणी काय आरक्षण निघणार,हे गुलदस्त्यात असले तरी उमेदवारी देताना पक्ष संघटनेंनी सर्कल मधील संयमी व स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी अशी मागणी मतदार राजा करताना दिसत आहे.अन्यथा "बसा बोंबलत" Basa Bombalat असे म्हणण्याची वेळ येऊ शकते अशी उपहासात्मक चर्चा सुद्धा ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे.आता याला कोणता पक्ष किती गंभीरतेने घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Voters' preference is "the candidate of the circle or the newcomer from other places.?"
                        --------//-------
                      
                   मुख्यसंपादक
                 सै.मूम्ताज़ अली.
  मो.९५९५६३०८११,९०४९३५८६९९.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या