Subscribe Us

header ads

Weather Rain Update. राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण.!

News@Rain Update...
            मध्यंतरी झालेल्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.दरम्यान आता काही दिवसांच्या उघाडीनंतर पुन्हा एकदा राज्यात वादळी पावसाचे आगमन होणार आहे. राज्यात आज पावसाला पोषक हवामान झाले आहे.त्यामुळे विवीध भागांत वादळी वाऱ्यासोबत जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.Weather Rain Update.
       "तापमानातील चढ-उतार कायम राहील." 
एवढंच नाही तर विदर्भ,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात गारपीट होईल.असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.तसेच राज्यात कमाल तापमानातली चढ-उतार कायम राहील असा देखील अंदाज व्यक्त केला जात आहे.दरम्यान राज्यात पावसाच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळे अलर्ट देण्यात आले आहे.
            "जारी करण्यात आलेले अलर्ट.
राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस पडणार आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार जारी करण्यात आलेले अलर्ट.
1) ऑरेंज अलर्ट:–विदर्भातील वर्धा,नागपूर, भंडारा,गोंदिया,चंद्रपूर तर मराठवाड्यातील बीड, धाराशिव.
2) यलो अलर्ट:-पुणे आणि नगर तसेच उर्वरित राज्यातजोरदार वाऱ्यासह वादळी पाऊस पडू शकतो असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
"900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती.
    सध्या मध्य प्रदेशमध्ये समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच दक्षिण तामिळनाडू आणि परिसरावर देखील 900 मीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहे.याशिवाय मध्यप्रदेश पासून,महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण तमिळनाडूतील चक्राकार वाऱ्यांपर्यंत समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडित वाऱ्यांची स्थिती कायम आहे.यामुळे पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.
           "तापमानात चढ-उतार होणार."
     दरम्यान राज्यात कमाल तापमानात घट झाली आहे.मात्र असे असले तरी राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा कायम आहे.काल जळगाव येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. 39 अंश सेल्सिअस असे हे तापमान होते.तसेच उर्वरित राज्यातील कमाल तापमान 34 ते 39 अंशांच्या दरम्यान आहे.या तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे.
Rain Update...
Weather Rain Update...
                           --------//--------
                        
                     मुख्यसंपादक
                   सै.मूम्ताज़ अली.
      मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या