Subscribe Us

header ads

जागतिक पुस्तक दिन.World Book Day.

News@World Book Day...
   जागतिक पुस्तक आणि कॉपीराइट दिन दरवर्षी 23 एप्रिल रोजी साजरा होतो.जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट.युनेस्कोने 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिन म्हणून घोषित केले.संपूर्ण जगभरात 23 एप्रिल रोजी ‘'जागतिक पुस्तक दिन'’ साजरा केला जातो.त्यामुळे आज सकाळपासूनच सोशल मीडियावर #World Book Day हा हॅशटॅग ट्रेण्ड होतांना दिसत आहे.नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे व जगभरातील लेखक आणि पुस्तकांचा सन्मान करणे हे या दिवसाचं खास उद्दिष्ट्य आहे.खरंतर अनेकांना आजच्या दिवशी ‘'वर्ल्ड बूक डे’' World Book Day का साजरा केला जातो किंवा या दिवसाचं महत्त्व काय हे माहित नाही.त्यामुळे या दिवसा मागची नेमकी कथा काय आहे हे जाणून घेऊयात.
        "23 एप्रिल याच तारखेची निवड का ?"
 विल्यम शेक्सपिअर,इंका गार्सिलोसा यासारख्या काही जगप्रसिद्ध व्यक्तींचं निधन 23 एप्रिल याच दिवशी झालं.त्यामूळे या दिग्गजांना श्रद्धांजली वाहण्यासाठी युनेस्कोने 23 एप्रिल रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्याची घोषणा केली.हा दिवस प्रथम 23 एप्रिल 1923 मध्ये स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी साजरा केला होता.त्यानंतर 1995 मध्ये पॅरिसमध्ये घेण्यात आलेल्या युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेमध्ये जगभरातील लेखकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी व नागरिकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जाईल असा निर्णय घेण्यात आला.
          "जागतिक पुस्तक दिनाचा इतिहास"
  युनेस्को संयुक्त राष्ट्र शैक्षणिक,वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेद्वारे प्रथमच 23 एप्रिल 1995 रोजी जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला.वाचन,प्रकाशन आणि कॉपीराईटला प्रोत्साहन देणे हे या कार्यक्रमा मागील कल्पना होती आणि तेव्हापासून जागतिक पुस्तक दिन हा एक जागतिक उत्सव बनलेला आहे,जो 100 हून अधिक देशांमध्ये साजरा केला जातो.संयुक्त राष्ट्र ने 23 एप्रिल ही तारीख जागतिक पुस्तक दिनासाठी निवडली कारण की,ती इतिहासातील दोन सर्वात प्रसिद्ध लेखकांच्या मृत्यूची तारीख आहे.William Shakespeare and Miguel de Cervantes.
     23 एप्रिल 1616 रोजी दोन्ही लेखकांचे निधन झाले आणि ते सर्व काळातील दोन महान साहित्यिक मानले जातात.
                   "पुस्तक वाचण्याचे फायदे"
पुस्तक वाचण्याचे अनेक फायदे Benefitsआहेत जे खालील प्रमाणे आहे...
शब्दसंग्रह सुधारणे:- वाचन शब्दसंग्रह आणि भाषा कौशल्य सुधारण्यास मदत करते हे वाचकांसाठी नवीन शब्द आणि वाक्यप्रचारांबद्दल उघड करते जे नंतर दररोजच्या संभाषणात वापरले जाऊ शकते.
तणाव कमी करणे:- वाचन हातान कमी करण्याचा आणि दिवसभरातील आरामाचा एक उत्तम मार्ग आहे पुस्तक.पुस्तक वाचन रक्तदाब कमी होण्यास मदत करू शकते.
ज्ञान वाढते:- नवीन गोष्टी शिकण्यासाठी वाचन हा उत्तम मार्ग आहे.काल्पनिक पुस्तक असो किंवा वेगवेगळ्या कालखंडातील कादंबरी,वाचनामुळे ज्ञान आणि समज वाढते.
World Book Day...
                             -------//-------
                     
                      मुख्यसंपादक
                    सै.मूम्ताज़ अली.
     मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या