Subscribe Us

header ads

गडचांदूरात बसस्थानकासाठी 2 मे रोजी "भीक मांगो आंदोलन" Bhik Mango Andolan" on May 2 for Bus Stand in Gadchandur.

News@Bhik Mango Andolan...
    गडचांदूर शहरात सुसज्ज असा बसस्थानक व्हावा,यासाठी उद्या 2 मे रोजी सकाळी 11 वाजता वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात  "भीक मांगो आंदोलन"  Bhik Mango Andolan आयोजित करण्यात आले आहे.Bhik Mango Andolan on May 2 for Bus Stand in Gadchandur.चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळखला जाणाऱ्या गडचांदूर शहरात मागील कित्येक वर्षापासून बसस्थानक नाही. कित्येकदा मागणी करण्यात आली.परंतू एकही लोकप्रतिनिंधी याकडे लक्ष दिले नाही. बसस्थानकाच्या नावाखाली काही वर्षापूर्वी माणिकगड सिमेंट कंपनीच्या माध्यमातून केवळ प्रवासी निवारे उभारून नागरिकांच्या तोंडाला पाणे पुसली गेली.याठिकाणी सर्वसुविधांयुक्त, सुसज्ज असा बसस्थानक नसल्याने येथे येणार्‍या महिला,पुरूष,शाळकरी मुली आणि विशेषतः वृद्धांना मोठ्याप्रमाणात मनस्ताप सहन करावा लागत आहे.या समस्या लक्षात घेता वंचित बहूजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भूषण फुसे यांच्या नेतृत्वात व वंचित बहूजन महिला आघाडी,युवा आघाडी, सम्यक विद्यार्थी आघाडी व स्थानिक जनता भीक मागून,जमा झालेली निधी बसस्थाननक उभारण्यासाठी शासनाला देणार असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे.या भव्य  "भीक मांगो आंदोलनात" गडचांदूर तसेच परिसरातील पीडित नागरिकांनी मोठ्यासंख्येने उपस्थित राहण्याची विनंती  "वंचित बहुजन आघाडी" च्या वतीने करण्यात आली आहे.
Bus Stop...
Bhik Mango Andolan" on May 2 for Bus Stand in Gadchandur...
                      --------//-------
                    
                 मुख्य संपादक
                सै.मूम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या