Subscribe Us

header ads

3 killed,7seriously injured in cruiser accident.क्रुझरच्या अपघातात तिघांचा मृत्यू,7 गंभीर जखमी.

News@Accident...
        चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे पिल्लरला धडक लागून झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना शेगाव येथे घडली. हा अपघात 22 मे सोमवार रोजी सकाळी अंदाजे 6 च्या सुमाराला घडला.अपघाताला बळी पडलेले सर्वजण पंढरपूर येथून देवदर्शन करून घरी परतत होते.या अपघातातील जखमींना अकोला येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले.3 killed, 7seriously injured in cruiser accident.
        बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील भाविक पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेले होते. पंढरपूरहून घरी परतत असताना या भाविकांच्या वाहनाला शेगावात मोठा अपघात घडला.शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविकांना घेऊन येणारी क्रुझर गाडी Cruiser car ही शहराच्या प्रवेशद्वारावर लावण्यात आलेल्या स्वागत फलकाच्या पिलरवर धडकली.सकाळी 6 वाजता झालेल्या या अपघातात 3 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर 7 भावीक गंभीर जखमी झाले आहे.नागरिकांच्या मदतीने सर्व भाविकांना शेगावच्या सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.गंभीर जखमी असलेल्या भाविकांना पुढील उपचारार्थ अकोल्यात हलवण्यात आले.चालकाला झोप लागल्याने हा अपघात झाल्याचे समजते.रात्री पासून हा प्रवास सुरू होता.आणि अगदी त्यांच्या घरापासून फक्त 2 किलो मीटर अंतरावर असताना हा अपघात घडल्याची माहिती पुढे आली आहे.
Devdarshan was the last.?
3 killed,7seriously injured in cruiser accident...
                      --------//-------
                    
                मुख्य संपादक
            सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या