Subscribe Us

header ads

Birthday,ॲड.वामनराव चटप यांच्या वाढदिवस.

News@Birthday...
   राजुरा विधानसभा क्षेत्राचे तीनदा प्रतिनिधित्व केलेले,उत्कृष्ट संसद पटू,माजी आमदार "ॲड. वामनराव चटप" Adv.Vamanrao Chatap यांची व्याच्या 72 व्या वर्षी ही सामाजिक कार्यगती अगदी तरूणांनाही लाजवणारी आहे. तळागाळातील सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आजही सदैव कट्टीबद्ध असतात, असे मत ज्येष्ठ विधी तज्ञ ॲड.मुरलीधर देवाळकर यांनी व्यक्त केले.ते कोरपना येथे शेतकरी संघटना, स्वतंत्र भारत पक्ष,गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या संयुक्त विद्यमानातून लोकनेते,उत्कृष्ट संसदपटू, माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्याच्या प्रसंगी बोलत होते.
         याप्रसंगी सत्कारमूर्ती माजी आमदार ॲड. वामनराव चटप,शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरूण पाटील नवले,जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती निळकंठ कोरांगे,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष श्रीनिवास मुसळे,जन सत्याग्रह संघटनेचे अध्यक्ष सैय्यद आबिद अली, जिल्हा बँकेचे माजी संचालक पांडुरंग जाधव, निशिकांत सोनकांबळे,गजानन जुमनाके, वंदनाताई चटप,माजी जिल्हापरिषद सदस्य कमलताई वडस्कर,जोस्ना मोहितकर, माजी सभापती रवी गोखरे,माजी पंचायत समिती सदस्य रमाकांत मालेकर,भास्करराव मुसळे,मदन सातपुते, दामोधर मालेकर,मारोतराव येरणे,बंडू राजूरकर,भास्कर मत्ते,अविनाश मुसळे,अरूण रागीट,रत्नाकर चटप,सुनील बावणे,विकास दिवे, राजीव ढवळे,दत्ता कांबळे,शब्बीर जहागीरदार, संतोष पटकोटवार,कपील इदे,मधुकर चिंचोलकर, धानोरकर आदींची उपस्थिती होती.याप्रसंगी बाजार समितीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.या अभिष्टचिंतन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी शुभेच्छा संदेश दिले.
  पांडुरंग जाधव यांनी आपल्या मनोगतात चटप साहेब,हे कार्यशील व्यक्तिमत्व आहे.त्यांच्या कारकिर्दीत राजुरा विधानसभेचा सर्वांगीण विकास झाल्याचे म्हटले.तसेच जिल्हाध्यक्ष अरूण नवले,निळकंठ कोरागे,सैय्यद आबिद अली, निशिकांत सोनकांबळे,रमाकांत मालेकर, बंडु राजूरकर,रत्नाकर चटप,सुनील बावणे यांनी चटप साहेबांच्या विधानसभेतील कार्यावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक बंडू राजूरकर, संचालन निता मुसळे तर आभार ॲड.श्रीनिवास मुसळे यांनी व्यक्त केले.
                            -------//-------
                         
                    मुख्य संपादक
               सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या