Subscribe Us

header ads

BJP supported panel wins...

News@BJP...
     गोंडपिपरी कृषि उत्पन बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी निवडून आलेल्या सभासदांचे मतदान पार पडले.यामध्ये भाजपा समर्थित परीवर्तन शेतकरी विकास आघाडीचे इंद्रपाल धुडसे सभापती तर स्वप्निल अनमुलवार यांची उपसभापती म्हणून बहुमताने निवड करण्यात आली.यानिमित्ताने भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.भोंगळे यांनी नवनिर्वाचितांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.BJP Supported Panel Wins.
        गोंडपिपरी कृषी उत्पन्न बाजार समितीत पहिल्यांदाच भाजपा समर्थित पॅनलने घवघवीत यश संपादित केले आहे.Gondpipari Krishi Utpann Bazar Samiti.यासाठी माजी जि.प. सदस्य अमर बोडलावार यांनी विशेष परिश्रम घेतले.त्याबद्दल भोंगळे यांनी त्यांचेही अभिनंदन केले.यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार्‍या सौ. पूजाताई भगत यांचे अभिनंदन करत पुष्पगुच्छ देऊन देवराव भोंगळे यांनी पक्षात स्वागत केला.
       नवनिर्वाचित सभापती धुडसे यांच्या नेतृत्वात संचालक मंडळाने येणाऱ्या काळात बाजार समितीत शेतकऱ्यांप्रती सहकार्याचे धोरण आणि शेतकरी हिताचे निर्णय घ्यावेत,प्रत्येक शेतकऱ्याला न्याय भुमिकेतून मदत होईल असे सेवामय उद्दीष्ट डोळ्या समोर ठेवून काम करावे, असे मत देवराव भोंगळे यांनी मार्गदर्शन करताना व्यक्त केले. 
          याप्रसंगी माजी आमदार ॲड. संजय धोटे, माजी आमदार सुदर्शन निममकर,लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे,किसान मोर्चा अध्यक्ष राजू घरोटे,तालुकाध्यक्ष बबन निकोडे,शहराध्यक्ष चेतन गौर,दिपक सावकार बोनगीरवार,सुहास सावकार माडुरवार,गणपती चौधरी,महेंद्रसिंह चंदेल, साईनाथ मास्टे,मनीष वासमवार,निलेश पुलगमकर,समीर निमगडे,चंद्रजीत गव्हारे,सौ. संजनाताई कम्मावार,संदीप पौरकार,विजय पेरकावार आदिंसह स्थानिक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.
Gondpipari Krishi Utpann Bazar Samiti is the first time BJP supported panel wins...
                        --------//-------
                       
                  मुख्य संपादक
              सैय्यद मुम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या