चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला.या घटनेला आठवडा उलटून गेला आहे.मात्र,पोलीस प्रशासनाकडून अद्यापही तपासाला गती आलेली नाही.विजय वडेट्टीवार यांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांशी दूरध्वनीवरून चर्चा करून आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी केली.25 मेपर्यंत आरोपींना पकडले नाही,तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढू,असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.बुधवारी पत्रकारांशी बोलताना माजी मंत्री वडेट्टीवार म्हणाले की,या प्रकरणाची लवकरात लवकर चौकशी करण्यासाठी मी पोलीस महासंचालकांशी दूरध्वनीवरून बोलले असून,आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी केली आहे.
"या घटनेचा सूत्रधार व हल्लेखोराला 25 मे पर्यंत अटक करावी.अन्यथा काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येईल.रास्ता रोको करण्यात येईल." त्याचबरोबर काही अनुचित प्रकार घडल्यास पोलीस व जिल्हा प्रशासन जबाबदार असेल,असे वडेट्टीवार यांनी सांगितले.
रावत यांच्यावर गोळीबार करून हल्लेखोर पळून गेले.या घटनेने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी पुढाकार घेऊन हल्लेखोर व सूत्रधाराला तातडीने अटक करायला हवी होती. पण,पोलीस प्रशासन थंडबस्त्यात आहे.तपास संथगतीने सुरू आहे.याबाबत काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
पोलीस खात्याने सदर प्रकरणी तपासाला गती द्यावी अशी मागणी काँग्रेस नेत्याने पालकमंत्र्यांकडे केली आहे.
---------//-------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.0
---------//-------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.0
0 टिप्पण्या