Subscribe Us

header ads

Bus Accident...50 फूट उंचावरुन बस कोसळली,15 जणांचा जागीच मृत्यू.

News@Bus Accident...           
         मध्य प्रदेशातील खरगौन जिल्ह्यात आज झालेल्या भीषण बस अपघातात Madhya Pradesh Khargone Bus Accident,15 प्रवाशांचा दुदैवी मृत्यू झाला.मृतकांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात असून या अपघातात अनेक प्रवासी जखमी असल्याचे कळते.खरगोन ठिकरी महामार्गावर डोंगरगाव येथे पहाटे अंदाजे 5 च्या सुमारास हा अपघात झाला. प्रवाशांनी भरलेली बस पुलाचे कठडे तोडून नदीत कोसळली.स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.हा अपघात नेमका कसा व कोणत्या कारणाने झाला, याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
                       "मदत जाहीर"
     दरम्यान,मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मदतीची घोषणा केली आहे. मध्यप्रदेश सरकारतर्फे अपघातातील मृताच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे.तर गंभीर जखमी असलेल्या प्रवाशांना 50 हजार रुपयांची मदत केली जाणार आहे.तर किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांन 25 हजारांची मदत केली जाणार असल्याची माहिती आहे.
Madhya Pradesh Khargone Bus Accident...
                         --------//-------
                  
                 मुख्य संपादक
             सैय्यद मुम्ताज़ अली
  मो.9595630812,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या