राजुरा-गोविंदपुर राष्ट्रीय महामार्ग National Highway 353 चे काम युद्धपातळीवर सूरू आहे. या महामार्गावर विराजमान औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्या व मोठी बाजारपेठ असलेल्या गडचांदूर शहर येथे,ड्रेनेज Drainage चे काम सुरू करण्यात आले आहे.ड्रेनेजच्या पलीकडे 2 मिटर जागा शिल्लक आहे.यापासून 11 के.व्ही. चे 2 आणि 33 के.व्ही.ची 1 लाईन जात आहे.जर या 3 ही लाईनीला मागे घेतले तर त्याला लागून असलेल्या कित्येक इमारतींना धोकादायक Danger to buildings ठरू शकते.जीवीतहानी होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.ऐवढ्या अपुऱ्या जागेत 3 लाईनचे पोल उभारणे शक्य नसून,यासाठी सदर लाईन येथील "रावी पेट्रोल पंप" पासून "सारंग पेट्रोल पंप" पर्यंत भूमिगत स्वरुपाची करण्यात यावी.Underground from "avi Petrol Pump" to "Sarang Petrol Pump" जेणेकरून भविष्यात होणार विवीध प्रकारचा धोका टाळता येईल,अशी मागणी गडचांदूर भाजपा शहराध्यक्ष सतीश उपलेंचवार यांनी राज्याचे वने,सांस्कृतीक कार्यक्रम,मत्सय व्यवसाय तथा पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली हे.

सदर निवेदनाची ना.सुधीर मुनगंटीवार यांनी त्वरित दखल घेऊन कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग विभाग गडचिरोली यांना आपल्या स्तरावरून योग्य ती कारवाई करावी व अहवाल कळवावा अशी विनंती केली आहे.
Right demand of Gadchandur BJP city president Satish Upalenchwar...
Electricity supply of the main road in Gadchandur should be underground...
----------//---------

मुख्य संपादक
सै.मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699
Electricity supply of the main road in Gadchandur should be underground...
----------//---------

मुख्य संपादक
सै.मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699
0 टिप्पण्या