Subscribe Us

header ads

Direct Communication. भारताच्या उपराष्ट्रपतींचा गडचांदूरच्या ॲड.दीपक चटप यांच्याशी थेट संवाद...

News@Korpanalive...
         President of Indiaभारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे लंडन दौऱ्यावर होते.दरम्यान भारतीय उच्चायुक्त कार्यालयाने Office of the High Commissioner त्यांचा निवडक भारतीयांशी संवाद आयोजित केला.या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील सुपुत्र व सध्या लंडन येथे कायद्याचे उच्चशिक्षण घेत असलेले ॲड.दीपक यादवराव चटप Adv. Deepak Yadavrao Chatap यांना निमंत्रित करण्यात आले होते.यावेळी उपराष्ट्रपती धनखड व ॲड.दीपक चटप यांच्यात थेट संवाद झाला.या संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधले.Live interaction between Vice president of India and Adv.Deepak Chatap.
          विशेष म्हणजे या संवादात्मक भेटीचे फोटो उपराष्ट्रपतींच्या अधिकृत फेसबुक,इंस्टाग्राम आदी सोशल मीडियावर प्रसिद्ध करण्यात आले असून वायरल झाले आहे.सदर कार्यक्रमात उपराष्ट्रपतींनी उपस्थितांना संबोधित केले.ते म्हणाले की, "जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतात युवकांची संख्या विपूल आहे. युवाशक्ती,ही खरी राष्ट्रशक्ती असते.विदेशातील भारतीय,हे इथले देशाचे अम्बेसिडर Ambassador आहेत,तुमच्या शिक्षणाचा उपयोग देशकल्याणासाठी करावा.जात,धर्म,पक्ष आदी भेदाभेद बाजूला सारून आपण भारतीय आहोत, ही ओळख स्मरणात असू द्या.” 
     दरम्यान भाषणानंतर उपस्थितांशी थेट संवाद साधताना ॲड.दीपक चटप यांचीही उपराष्ट्रपतींनी विचारपूस केली. "मी चंद्रपूर जिल्ह्यातील चेवेनिंग स्कॉलर तरुण वकील Chevening Scholar Young Lawyer आहे.शेतकरी,आदिवासी, कामगार आणि वंचित घटकांच्या प्रश्नांबाबत रचनात्मक पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत असतो.वकीली व संसदीय धोरणनिर्मिती हे माझे मुख्य आवडीचे विषय.या दोन्ही स्तरावर तुम्ही केलेले काम दिशादर्शक वाटते" असे हितगुज दीपक चटप यांनी केला.यावर स्मितहास्य करत उपराष्ट्रपती म्हणाले, "आपण करत असलेले काम कौतुकास्पद आहे.धोरणनिर्मिती आणि विधीक्षेत्र यांच्यात अनेक समान दुवे आहेत.त्यामुळे या दोन्ही स्तरावर योगदान देता येत आहे.तुमच्या सारख्या युवकांकडून अनेक आशा आहेत. उत्तमोत्तम काम करत राहा" अशा सदिच्छा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केल्या. यावेळी भारताचे उच्चायुक्तांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.भारताच्या उपराष्ट्रपतींशी लंडनला संवाद साधण्याची संधी मिळणे हा,माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण ठरला असून देशाच्या धोरण निर्मितीतील प्रमुखांपैकी एक व्यक्ती,राज्यसभेचे सभापती आणि ज्येष्ठ वकील असलेल्या उपराष्ट्रपतींना जवळून अनुभवता येणे प्रेरणादायी असल्याचे मत ॲड. दीपक चटप यांनी व्यक्त केले आहे.
Live interaction between Vice president of India and Adv.Deepak Chatap...
                        -------//-------
                 
                 मुख्य संपादक
             सैय्यद मुम्ताज़ अली.
   मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या