Subscribe Us

header ads

Ditched girlfriend, parents feel ashamed. मैत्रिणीला फसवले,आई-वडिलांची मान खाली गेली.

News@Suicide...
    अकोला:-  "मी जे काही कृत्य केले ते,अत्यंत वाईट आहे.मैत्रिणीला फसवले,माझ्या या कृत्यामुळे आई-वडिलांना शरमेने मान खाली घालावी लागली,अनेकांचा रोष पत्करावा लागला, याचा मला खूप पश्चाताप होत आहे" अशा आशयाची चिठ्ठी लिहून ठेवत 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली.Youth committed suicide. 29 एप्रिल शनिवार रोजी दुपारच्या सुमारास त्याने गुडधी मरघट रेल्वे मार्गावर Guddhi Maraght Railway Line रेल्वे गाडीसमोर स्वत:ला झोकून देत जीवनयात्रा संपवली.मृतक आई,वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.या घटनेचा त्यांना जबर धक्का बसला आहे.त्याच्या मृत्यूनंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे.स्वराज हगवणे वयवर्ष 20, असे मृत तरुणाचे नाव असून तो सिसा-मासा येथील रहिवासी होता. Youth committed suicide.
          स्वराजविरूद्ध वर्षभरापूर्वी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.तो बार्शीटाकळीतील एका महाविद्यालयात बीकॉम प्रथम वर्षाला शिकत होता,अशी माहिती असून त्याच्या आत्महत्येने हगवणे कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या मृत्यूनंत सिव्हिल लाइन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मृत्यूपूर्वी स्वराजने 2 पानांची चिठ्ठी लिहून,त्यात पश्चाताप व्यक्त केला आहे.मी अत्यंत वाईट कृत्य केल्याची कबूली त्याने दिली आहे.मी मैत्रिणीला फसविले आहे,माझ्या कृत्यामुळे माझ्या आई,वडिलांना शरमेने मान खाली घालावी याचा मला पश्चाताप होत असल्याचे त्याने म्हटले आहे.सदर घटनेची पुढील तपास सिव्हील लाइन पोलीस करीत आहे.
           तरुणांच्या आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे.यामुळे पालकांची चिंता वाढली आहे.पालकांनी वेळीच लक्ष घालून मुलांना सावरणे आवश्यक असल्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांकडून दिला जातो.पण, मुलांच्या हालचाली घरी अगदी सामान्य असतात. अशात मुलांबाबत घरच्यांना फारशी माहिती मिळणे कठिण असल्याचे मत व्यक्त होत आहे.
Ditched girlfriend, parents feel ashamed
                          --------//-------
                 
                   मुख्य संपादक
                  सै.मूम्ताज़ अली.
     मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या