लहानपणी दिव्यंगतव आल्यानंतर हार न मानता नांदेड जिल्हा अर्धापूर तालुक्यातील चोरंबा या गावातील एका तरूण शेतकऱ्याने समाजापुढे चांगला आदर्श ठेवला असून याने शेतीत आपले मन रमवले,मेहनत करून जिद्द व चिकाटीने शेती करत ती यशस्वी केली आहे.गजानन नरोटे असे अपंग शेतकऱ्याचे नाव असून यांनी दिव्यांगत्वावर मात करून स्वतःची 3 एकर शेती आणि दुसऱ्याच्या 7 एकर शेतीमधून भरघोस उत्पन्न काढले.अनेक शेतकऱ्यांना त्याचा प्रवास प्रेरणादायी ठरत आहे.स्वतः 2 पायांनी अपंग असूनही तो 10 एकर शेती करत आहे.यामध्ये केळी,हळद,ज्वारी,गहू व सोयाबीन पिके घेत आहे. या मेहनतीमुळे दोन्ही पायाने अपंग असूनही ताटमानाने पायांवर उभा आहे,असेच म्हणावे लागेल.
गजानन हा बालपणापासून दोन्ही पायांनी दिव्यांग आहे.त्याचे शिक्षण 12 वी पर्यंत झाले, आईवडील,यांच्याकडून शेतीमधील कामे होत नसल्याने शेतीची व घराची जबाबदारी गजानन वर पडली,त्यामुळे त्याचे शिक्षण अर्धवट राहिले, पुढील शिक्षण थांबवले,शेतीकडे लक्ष देण्यास सुरूवात केली.दोन्ही पायांनी अपंग असताना शेती करणे अवघड होते.परंतु त्याच्या अंगात जिद्द, चिकाटी असल्याने अपंगत्वावर मात करून शेतीमध्ये भरघोस उत्पन्न काढत आहे.शेती करताना सुरूवातीला अडचणींचा सामना करावा लागला.परंतू,कालांतराने कामाची सवय आणि जिद्दीपुढे काहीही अशक्य नव्हते.दोन्ही पायांनी अपंग असताना गजानन शेतीमधील सर्व कामे स्वतः करत आहे.तसेच त्याच्याकडे दुधाळ 3 जनावरे आहे.त्यांचे स्वतः दूध काढतो आणि बाजारात विकतो.यातून समाधानकारक उत्पन्न त्याला मिळत आहे.Donhi payanni apang,setisaha phulvila sansar...
शासनाकडून चार्जिंगची 3 चाकी रिक्षा Charging 3 wheeler rickshaw मिळाल्याने गजाननचा हा प्रवास सोपा झाला.दररेज रिक्षाने तो अर्धापूरला जाऊन दूध विकतो,तसेच रिक्षानेच शेताकडे जातो.11 वर्षांपासून दिवसरात्र मेहनत करून 2 बहिणीचे लग्न केले,पुढील महिन्यात तिसऱ्या बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू आहे.हे सर्व त्याने स्वतः शेतीवरच कमावले.शेतकरी वर्गात निराशेच्या या वातावरणात दिव्यांग शेतकरी असलेला गजानन नरोटे यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला हे मात्र विशेष.
Handicapped with both legs...
--------//-------

मुख्य संपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.
0 टिप्पण्या