News@Dress code...
महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये वस्त्र संहिता dress code लागू करण्याचा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतला आहे.आजपासून नागपुरातील मंदिरात याची सुरूवात करण्यात आल्याची माहिती महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रपरिषदेत दिली आहे.Dress code in temples in the state.यासंदर्भात घनवट म्हणाले की,जळगाव येथे फेब्रुवारी महिन्यात तीनशेहून अधिक मंदिर पदाधिकाऱ्यांचा सहभाग असलेल्या महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेची बैठक झाली.यामध्ये मंदिराचा निधी,शासनाकडे मंदिरे स्वाधीन करणे आदी विषयांवर चर्चा झाली. Decision of Maharashtra Temple Federation.
जळगाव जिल्ह्यातील तालुका अमळनेर श्री मंगळग्रह मंदिरामध्ये पहिला निर्णय घेण्यात आला.नागपूरात सुद्धा गेल्या वर्षी बैठक झाली आणि या उपक्रमाला सुरवात झाली.मंदिराचे पावित्र्य टिकविलेच गेले पाहिजे.ही भूमिका डोळ्यासमोर ठेऊन ही वस्त्र संहिता लागू करण्यात आली.देशातील अनेक मंदिरात पूर्वीपासूनच वस्त्र संहिता लागू आहे.तामिळनाडूमध्ये उच्च न्यायालयाने वस्त्र संहिता लागू करण्याचे आदेश दिले होते.ही प्रक्रिया जागृतीची आणि प्रबोधनाची आहे,असेही घनवट यांनी नमूद केले.राज्य शासनाच्या ताब्यात असलेल्या मंदिरात हा निर्णय लागू करावा अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री,यांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.नागपुरातील 4 मंदिरांमध्ये ही वस्त्र संहिता लागू झाली आहे.यामध्ये श्री गोपालकृष्ण मंदिर धंतोली,श्री संकटमोचन पंचमुखी हनुमान मंदिर बेलोरी ता.सावनेर,श्री बृहस्पती मंदिर कानोलीबारा,श्री दुर्गामाता मंदिर हिलटॉप,या मंदिराचा समावेश आहे.काही जण अज्ञानापोटी तोकडे कपडे घालतात.मात्र,मंदिरात प्रवेश करताना,अशा स्त्री,पुरुषांना ओढणी,रूमाल आदी कापड अंगावर घेऊनच प्रवेश करण्याचा आग्रह मंदिर संस्थांकडून करण्यात येणार आहे. मंदिराबाहेर तसा फलकही लागणार असल्याचे कळते.
Dress code in temples in the state...
Decision of Maharashtra Temple Federation...
---------//---------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या