चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कांग्रेस नेते संतोष रावत यांच्यावर 11 मे गुरुवार रोजी रात्री अंदाजे 9.30 वाजताच्या सुमारास मुल येथे गोळीबार Firing करण्यात आली.या हल्ल्यात रावत यांच्या डाव्या हाताला गोळी स्पर्श करून गेल्याने त्यांच्या हाताला गंभीररित्या दुखापत झाली.हल्लेखोर स्विफ्ट डिझायर गाडी Swift Dzire car ने आले होते.हल्ल्यानंतर ते नागपूर मार्गे पसार झाल्याची माहिती आहे.सी.डी. सी.सी.बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत,हे सी.डी. सी.सी.बँक शाखा मुल समोरून आपल्या स्कूटीकडे जात असताना बँकेचे समोर काहीच अंतरावर रोडवर उभ्या असलेल्या स्विफ्ट गाडीत बसून असलेल्या बुरखा धारक व्यक्तीने रावतांवर गोळीबार केला.CDCC Bank President Chandrapur.गोळी डाव्या हातावर लागली व थोडी दुखापत झाली.गोळी झाडताच गाडी घेऊन हल्लेखोर पसार झाले.गोळी हातावर लागून बाहेर गेल्याने रावत थोडक्यात बचावले. मूल पोलीस ठाण्यात घटनेची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे.

0 टिप्पण्या