Subscribe Us

header ads

Firing on Santosh Singh Rawat.संतोष सिंह रावत यांच्यावर गोळीबार.


News@Firing...
     कॉंग्रेस नेते व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष,कॉंग्रेस नेते संतोष सिंह रावत Congress Leader,President of CDCC Bank Santosh Singh Rawat यांच्यावर 11 मे रोजी मूल येथे Firing गोळीबार झाली होती.यासंदर्भात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार Sudhir Mungantiwar यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक S.P.रवींद्रसिंह परदेसी यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले होते.परंतू जवळपास एक आठवडा लोटूनही पोलिसांच्या हाती काही ठोस लागला नसल्याने हल्लेखोर मोकाट आहे. त्यामुळे आता मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षकांना लेखी पत्र देत हल्लेखोरांवर अटकेची कारवाई करीत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे. संतोष रावतांवरील प्राणघातक हल्ल्याची गंभीर दखल मुनगंटीवारांनी घेतल्याची चर्चा होत आहे. मूल येथील चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेसमोरून दुचाकीने रावत जात असताना चारचाकी वाहनातून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.हल्लेखोरांनी चेहरे झाकले होते.हल्ल्यानंतर हल्लेखोर नागपूरच्या दिशेने पसार झाल्याची माहिती असून या हल्ल्यात रावत थोडक्यात बचावले,गोळी त्यांच्या डाव्या हाताला स्पर्श करून गेल्याने हाताला जखम झाली होती.या घटनेने राजकीय वर्तुळ एकच खळबळ माजली आहे.दरम्यान घटनेचा निषेध म्हणून मूल येथे सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला होता.The political circle was shocked.
           जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या अटकेसाठी निदर्शनेही केली होती. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची 9 पथके गठीत करण्यात आल्याची माहिती आहे.पण,अजूनही त्याचा पाहिजे तसा उपयोग झाला नसल्याचे आरोप होत आहे.जिल्ह्याच्या इतिहासात एखाद्या राजकीय नेत्यावर गोळीबाराची ही पहिलीच घटना.रावत यांचे कुणाशीही वैर नाही.मात्र, त्यांच्यावर पाळत ठेवून गोळी झडली गेली,ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.आठवडा उलटून गेला तरीही हल्लेखोरांचा शोध लागलेला नाही. संतोष रावतांवर हल्ला करणारे आणि हल्ल्याचा मास्टर माईंड शोधून त्याला तातडीने अटक करावी,अशी मागणी लाऊन धरण्यात आली आहे.यासाठी CDCC बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरून संपर्क करून सातत्याने या प्रकरणाचा फॉलोअप Follow up भ्रमणध्वनिवरून घेतल्याचे कळते.आरोपींना अटक करण्यासंदर्भात त्यांनी पोलीस अधीक्षकांना निर्देश दिले होते,तरीही आरोपी मोकाटच आहे.म्हणून आज 19 मे रोजी मुनगंटीवारांनी पोलीस अधीक्षकांना पत्र दिल्याची माहिती आहे.हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी व सविस्तर अहवाल कळवावा.असे मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे म्हटले असून यामुळे आतातरी आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
Firing on Congress Leader,President of CDCC Bank Santosh Singh Rawat....
The political circle was shocked....
                          -------//------
                 
                 मुख्य संपादक
             सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.0

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या