Subscribe Us

header ads

Inauguration of Hanuman Temple. चेकबोरगांव हनुमान मंदिर लोकार्पण सोहळा...

News@𝐃𝐞𝐨𝐫𝐚𝐨 𝐁𝐡𝐨𝐧𝐠𝐥𝐞...
       रामभक्त भगवान बजरंगबली,हे सेवा आणि भक्तीशक्तीचे सर्वोच्च मानक आहे,आज संपुर्ण देशात असे एकही गाव नाही,ज्याठिकाणी मारोतीरायाचे मंदीर नाही.याअर्थी आपल्या भारतात सेवा आणि सेवेकरी दोघांनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.प्रभुरामांची भक्ती आणि सत्यासाठी बजरंगबलींनी आपली शक्ती अर्पीली,त्याचे संपूर्ण जीवन चरीत्र आपणा सर्वांसाठीच सेवा व भक्तीचे एक आदर्शवत उदाहरण आहे.आज आपण सर्वांच्या साक्षीने आणि भक्तीपुर्ण वातावरणात या जिर्णोद्धार झालेल्या शक्ती स्वरूप हनुमान मंदीराचे लोकार्पण Inauguration of Hanuman Temple करण्याचे पुण्य मला मिळते आहे,हे मी माझे भाग्य समजतो,येणाऱ्या काळात या पवित्र मंदिराच्या माध्यमातून ग्रामोन्नतीचे कार्य व्हावे,गावातील ऐक्य आणि धार्मिक,सांस्कृतिक कार्य गुण्यागोविंदाने पार पडावे,अशी अपेक्षा या शुभ प्रसंगी व्यक्त करतो,असे भावनिक मत भाजपा जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवरा भोंगळे 𝐃𝐞𝐨𝐫𝐚𝐨 𝐁𝐡𝐨𝐧𝐠𝐥𝐞 यांनी व्यक्त केले.
ते गोंडपिपरी तालुक्यातील मौजा चेकबोरगांव येथे आयोजित हनुमान मंदिराच्या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.Inauguration of Hanuman Temple.याप्रसंगी मंदिर कमिटीच्या वतीने शाल,श्रीफळ व पुष्प देऊन भोंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
       यावेळी,बालब्रम्हचारी पितांबरजी महाराज, तालुकाध्यक्ष बबन निकोडे,माजी जि.प.सदस्य सौ.स्वातीताई वडपल्लीवार,सरपंच सुदर्शन कोवे, उपसरपंच जोगेश्वर उपासे,मंदिर कमेटी अध्यक्ष सुनील मांडवकर,सचिव मंगेश शेंडे,दिपक माडुरवार,भाऊजी भोयर,जानकीराम झाडे, देवीदास मंगर,सौ.वर्षाताई शेंडे,सौ.पौर्णिमाताई मडावी,तुळशीराम बारसागडे,प्रविण शेंडे,गजानन झाडे,सौ.सुषमाताई झाडे,प्रभूदास झाडे आदींसह हनुमान भक्तांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यानिमित्ताने याठिकाणी मागील 2 दिवसांपासून विवीध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.आज गोपालकाला व महाप्रसादाने सांगता करण्यात आली...
𝐃𝐞𝐨𝐫𝐚𝐨 𝐁𝐡𝐨𝐧𝐠𝐥𝐞...
Hanuman temple dedication ceremony...
                         -------//------
                       
                  मुख्य संपादक
             सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.९०४९३५८६९९,९५९५६३०८११.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या