Subscribe Us

header ads

Leopard jailed in the Savli forest area.सावली वनपरिक्षेत्रात बिबट जेरबंद.

News@Leopard...
         चंद्रपूर जिल्ह्यात सावली वनपरिक्षेत्रातील समदा नियत क्षेत्रालगत शेतशिवारात हल्ला झालेल्या परिसरात मादी बिबट पिंजर्‍यात जेरबंद झाल्याचे समोर आले आहे.तिच्या 2 पिल्लांना आधीच वनविभागाने पकडले होते.दरम्यान या भागात हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून पकडण्यासाठी शोध मोहीम जारी असल्याची माहिती आहे.Leopard jailed in the Savli forest area.सावली वनपरिक्षेत्रातील व्याहाड उपक्षेत्राच्या समदा नियतक्षेत्रालगत असलेल्या शेतात एक 55 वर्षीय महिला सकाळी आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली होती.तेव्हा प्रात:र्विधीसाठी शिवारात जात असताना अचानक वाघाने तिच्यावर हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची घटना दोन दिवसापुर्वी घडली होती.हल्लेखोर वाघाने 3 जणांचे बळी या भागात घेतल्याची माहिती असून त्या हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आदेश 27 एप्रिल रोजी देण्यात आले आहे.या हल्लेखोर वाघाला पकडण्याची तेव्हापासून "आरआरयु” RRU व ताडोबाचे ”एसटीपीएफ” STPF चे पथक तैनात आहे.पण पथकाला अजूनही यश आलेले नाही.दोन दिवसापुर्वी घडलेल्या घटनेनंतर हल्लेखोर वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याच्या मोहिमेस गती आली आहे.त्यातच सायंकाळी वनविभागाने 2 बिबट पिल्लांना पकडले होते.गावालगत बिबट्याचा वावर बघता त्यांच्या आईलाही जेरबंद करणे गरजेचे होते.तेव्हा पिंजऱ्यात 2 पिल्लांना ठेवण्यात आले होते. त्यावेळी तेथे आलेल्या मादी बिबट्या अलगतपणे रात्री हल्ला झालेल्या ठिकाणापासून 50 मीटर अंतरावर असलेल्या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती आहे. 
Leopard jailed in the  Savli forest area...
                      --------//-------
                    
                मुख्य संपादक
            सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या