News@सत्कार...
नुकताच वर्ग 12 वि चा निकाल घोषित झाला, दरवर्षीप्रमाणे यंदाही 'सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालया' ने उत्कृष्ट निकालाची परंपरा राखली असून यावर्षी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकूण निकाल 94.16% लागला आहे. Continuing the tradition of excellent results.कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागाची टक्केवारी 100% एवढी असून व्यवसाय विभागाचा निकाल 85 % आहे.कला विभागाचा निकाल 88.32% टक्के लागला असून कला विभागातून 'रोहित पेंदोर' या विद्यार्थ्यांने 600 पैकी 525 गुण प्राप्त केले असून 87.50% गुण घेऊन,त्याने महाविद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला.तसेच 'क्रिष्णा पाटील' या विद्यार्थ्याने 600 पैकी 481गुण प्राप्त करून महाविद्यालायातून द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.त्यांच्या निकालाची टक्केवारी 80,17% एवढी आहे.तसेच अविनाश राठोड,या विद्यार्थ्यांने 600 पैकी 476 एकूण 79.33% गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक पटकाविले.तसेच 'जुबेर मोहम्मद शेख' या विद्यार्थ्याने 500 पैकी 462 गुण घेऊन महाविद्यालयातून चतुर्थ येण्याचा मान मिळविला, त्याच्या निकालाची टक्केवारी 77% एवढी आहे. 'सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर' तसेच 'सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर' ह्यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. Meritorious felicitated in Savitribai Phule Junior College.
या कार्यक्रमास संस्थेचे सचिव नामदेव बोबडे, प्राचार्य धर्मराज काळे,पर्यवेक्षक महेंद्र ताकसांडे तसेच विभाग प्रमुख प्रा.प्रशांत खैरे,प्रा.सोज्वल ताकसांडे,सहा.शिक्षक राजू वासेकर तसेच सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालकवृंद उपस्थित होते. या प्रसंगी संस्थेचे सचिव नामदेव बोबडे यांनी ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी बिकट परिस्थितीवर मात करून मिळवलेल्या यशाबद्दल तोंडभरून कौतुक केले.तसेच आपल्या अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करताना भविष्यात उत्तम यश मिळवा व महाविद्यालयाचे नाव लौकिक करा, असा मार्मिक सल्ला दिला.कार्यक्रमाचे संचालन प्रा.जहीर सैय्यद तर आभार प्रा.दिनकर झाडे यांनी व्यक्त केले.सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व आपल्या गुरुवर्यांना दिले.संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
Continuing the tradition of excellent results...
Meritorious felicitated in Savitribai Phule Junior College...
--------//-------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या