Subscribe Us

header ads

MSEB,विजेचा लपंडावमुळे नागरिक हैराण.

News@महावितरण...
Maharashtra State Electricity Distribution Company Limited महावितरणकडून विद्युत ग्राहकांना 24 तास वीज उपलब्ध व्हावी,अशी नागरिकांना अपेक्षा असते,मात्र गडचांदूर महावितरणाकडून अपेक्षाभंग होत आहे.एकीकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे,तर दुसरीकडे वीज बिलाची मात्र सुलतानी वसुली सुरू असल्याचे आरोप होत आहे.मे महिना सुरू असल्याने तापमानात कमालीची वाढ झाली आहे.यापासून बचावासाठी कुलर,पंखे व एसीचा The use of coolers,fans and AC,वापर वाढला आहे.अशा स्थितीत जर वीज पुरवठा खंडित झाला तर जिवाची लाहीलाही होत आहे. वेळेवर बिल भरूनही नागरिकांना विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत आहे.गडचांदूर येथील महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष व नियोजन शुन्य कारभाराचा Mismanagement फटका बिचाऱ्या ग्राहकांना बसत असून दररोज होत असलेल्या विजेचा लपंडवामुळे संताप व्यक्त होत आहे.शहरात वेळीअवेळी वीज पुरवठा खंडीत हाेत असल्याने वीज ग्राहकांना इतर ऋतू बरोबरच उन्हाळ्यातही विजेच्या लपंडाव त्रासदायक ठरू लागला आहे.एकीकडे नियमितपणे वीज पुरवठ्याची बोंब असताना दुसरीकडे वीज बिलाची मात्र शंभर टक्के वसुली सुरू असल्याचे संतापजनक आरोप नागरिकांकडून होत आहे.Mismanagement of Mahadistribution Officers.आठवडा भरापासून तापमानातही वाढ झाल्याने घरात वीज पुरवठा सुरळीत राहणे गरजेचे झाले आहे, यादृष्टीने महावितरण कंपनीने आवश्यक उपाययोजना कराव्यात,अशी भावनाही नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
"वीज पुरवठा करण्यास गडचांदूर महावितरण 
                        अपयशी."
          शहर व संबंधित खेड्यापाड्यात 24 तास वीजपुरवठा करण्यात गडचांदूर महावितरण अपयशी ठरत असून गडचांदूरसह परिसरातील खेड्यापाड्यात तर दररोज दिवसातून 10 ते 15 वेळा वीजपुरवठा खंडित होत आहे.यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर संबंधित अधिकारी यांचा मोबाईल बंद अथवा busy बिजी येते,संपर्क काही होत नाही.यासंदर्भात आजच exec इंजिनिअरला याची माहिती दिली आहे. महाविरणाने नियमित पुरवठा द्यावा,नागरिकांचा अंत पाहू नये,अन्यथा तिव्र आंदोलन उभारण्याच्या इशारा गडचांदूर नगरपरिषद गटनेता,नगरसेवक विक्रम येरणे यांनी "कोरपना Live" च्या माध्यमातून दिला आहे.
                      ----------//----------
                 
                मुख्य संपादक
           सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या