Subscribe Us

header ads

Naseem Khan's demand for Haj Yatri.हज यात्रेकरूंसाठी नसीम खान यांची महत्वाची मागणी.

News@Haj Yatra....
            हज यात्रेला जाण्याची इच्छा असणाऱ्या सर्वसामान्य मुस्लिम व्यक्तीचे हे स्वप्नही आता धुसर झाले आहे.केंद्र सरकार हज यात्रेकरूंसाठी सवलत देत होते.परंतू केंद्रातील भाजपा सरकारने हज यात्रेकरूंचा कोटा कमी करून यात्रेसाठी लागणाऱ्या खर्चातही वाढ केली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणात जातीने लक्ष घालून हज यात्रेकरूंचा कोटा पूर्ववत करावा व वाढवलेला खर्चही कमी करून मुस्लिम बांधवांना दिलासा द्यावा,Restore quota of Hajj Yatri, अशी मागणी राज्याचे माजी मंत्री व State Congress Committee Working President Naseem Khan प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांना पाठवलेल्या पत्रात नसीम खान म्हणतात की, केंद्रीय हज कमिटीच्या माध्यमातून हज यात्रेला जाणारे लोक गरिब व आर्थिकदृष्ट्या कमी उत्पन्न असलेल्या गटातील असतात.2019 पर्यंत केंद्रीय हज कमिटीमार्फत दरवर्षी 2 लाख लोकांना हज यात्रेसाठी पाठवले जात होते व त्यांच्यासाठी लागणारा खर्च 2.9 लाख रुपयांपेक्षा कमी होता.यात कुर्बानीसाठी लागणाऱ्या खर्चाचाही समावेश होता. तसेच या रकमेतून हज यात्रेकरूला 2100 सोदी रियाल म्हणजे 45 हजार रूपये व एक अधिक एक व्हीआयपी बॅग VIP bag सह परत दिले जात असते.परंतू 2023 पासून केंद्रीय हज कमिटीने हज यात्रेकरूंचा कोटा कमी करून 1.5 लाख केला आहे.तसेच हज कमिटीने शुल्कवाढ करून ती 3.7 लाख रूपये केली आहे. यात कुर्बानीसाठीच्या रक्कमेचाही समावेश नाही. मुंबईहून हज यात्रेसाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा नागपूर व औरंगाबादमधून जाणाऱ्यांसाठी 70 ते 80 हजार रूपये जादा द्यावे लागतात.हा वाढीव खर्च अन्यायकारी व मुस्लीम समाजातील सामान्य जनतेवर आघात करणारा आहे.
केंद्रीय हज कमिटीच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात चर्चा केली असता,या कमिटीकडे अधिकार नसून मंत्रालयाकडे अधिकार असल्याचे सांगण्यात आले आहे.आयुष्यात एकदा हजयात्रा केली की आयुष्य सार्थकी लागते अशी मुस्लीम समाजाची भावना आहे.त्यांचा या भावनांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्वीचाच कोटा व पूर्वीचेच शुल्क पुन्हा सुरू करावे,अशी विनंती केली आहे.केंद्र सरकारने हज यात्रेचा कोटा कमी केल्याने सामान्य हज यात्रेकरूंची खाजगी कंपन्यांकडून लुट केली जात आहे.विमान प्रवासाचे दर जास्त आकारले जात आहेत,यामागे एक मोठे रॅकेट Racket कार्यरत असून तिर्थयात्रा करू पाहणाऱ्या भाविकांना निवडले जात आहे, असेही नसीम खान म्हणाले.
Naseem Khan's demand for Haj Yatri...
                          --------//--------
                    
                     मुख्य संपादक
                सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या