Subscribe Us

header ads

NCP President Sharad Pawar.शरद पवारांच्या त्या सूचनेने ठाकरेंच्या चिंतेत वाढ.

News@Politics...
             2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघांत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होते,त्या जागांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar on Seat sharing यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना दिल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची 17 मे रोजी शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक झाली.या बैठकीत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा झाल्याचे समजते. पवारांच्या या आदेशामुळे शिवसेनेच्या ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.त्यामागील कारण म्हणजे राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी 48 जागांवर तसेच लोकसभेच्या 48 पैकी 15 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला दुसऱ्या नंबरची मते मिळाली होती.विशेष म्हणजे विधानसभेच्या 18 मतदारसंघात आणि लोकसभेच्या 8 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची थेट शिवसेनेसोबत लढत झाली.त्यामुळे याठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध ठाकरे  गट असा सामना रंगणार की काय,अशी भीती आता ठाकरे गटात व्यक्त होत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचे चित्र बदलू शकते.चित्र नाही बदलले तर ठाकरे गट या लढती होऊ देणार का अथवा या जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडणार का,हे देखील अस्पष्ट आहे.
NCP President Sharad Pawar on Seat sharing...
                ----------//--------        
                    
                   मुख्य संपादक
               सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.959563081,9049358699.
 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या