Subscribe Us

header ads

Operation Narcos.बेवारस बॅगेतील 9 किलो 350 ग्राम गांजा जप्त.?

News@Narcotics
     अवैधरीत्या अंमली पदार्थांची तस्करी रोखण्या  साठी विशेष देखरेख व तपासणी करून रेल्वे विभाग ऑपरेशन नार्कोस Operation Narcos चालवत आहे.याच पार्श्वभूमीवर गोंदिया रेल्वे पोलीस स्थानक परिसर आणि पॅसेंजर गाड्यांमध्ये अवैध अंमली पदार्थांची तस्करी रोखण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर करीत असतानाच एका गुप्त माहितीच्या आधारे,रेल्वे क्रमांक 12843 पुरी-अहमदाबाद एक्स्प्रेसचा डबा क्रमांक एस-6 मधील बर्थ क्रमांक 56 मध्ये,एक रंगीत मध्यम आकाराची ट्रॉली बॅग रेल्वे पोलिसांना संशयास्पद आढळली.बसलेल्या प्रवाशांकडून सदर बॅगबाबत चौकशी केली असता,बॅगच्या मालकाची माहिती एकाही प्रवाशाने दिली नाही.त्याची तपासणी केली असता,खाकी रंगाची दाट टेपिंगची 9 छोटी पाकिटे आढळून आली.ज्यामध्ये अमली पदार्थ गांजा आढळून आला.Gondia Railway Police seized 9.350 grams ganja.या 9 बंडल गांजासह जप्त केलेली बेवारस ट्रॉली बॅग रेसुब पोस्ट गोंदिया येथे आणण्यात आली.जेथे एनडीपीएस कायद्यांतर्गत NDPS Act अज्ञाता विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन 9.351किलो असून याचे सध्याचे बाजार मूल्य 93,510/-रूपये असल्याचे कळते.
Operation Narcos...
Gondia Railway Police seized 9.350 grams ganja...
                       --------//-------
                      
                 मुख्य संपादक
              सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या