Subscribe Us

header ads

Selling ice cream आईचा जीव वाचवण्यासाठी बहिण-भाऊ विकतात ice cream.

News@korpanalive...
    एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही सत्य घटना.आई आजारी असताना बूट पॉलिश किंवा इतर कामे करून पैसे कमावणारी लहान मुले तुम्ही बॉलिवूड चित्रपटांत पाहिली असतील.मात्र आता अशी घटना खरोखर घडली आहे.दक्षिण चीन मॉर्रिंग पोस्टने याबाबतीत बातमी दिली आहे. चीन China मधील हेनान Henan प्रांतात हा प्रकार घडला आहे.एक लहान मुलगी आणि तिचा लहान भाऊ,हेनान प्रांतात राहतात आणि आपल्या घरापासून सुमारे 3 किमी सायकलवरून प्रवास करत गेले आणि तिथे त्यांनी तीन दिवसांत एक हजार आईस्क्रीमची विक्री Selling ice cream केली.याबद्दल कारण जाणून घेतल्यावर कळलं की त्यांची आई रूग्णालयात दाखल झाली होती.या लहान मुलांची आई आईस लॉली आणि आईसस्क्रीम विकते.तिला लहानपणीच पोलिओ झाला होता.तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.मग आपल्या आईला मदत करण्यासाठी मुलांची तिचा व्यवसाय सांभाळण्याचा निश्चय केला.
     पहिल्या दिवशी 300 पेक्षा अधिक आईसक्रीम त्यांनी विकले.आणि मग दुसऱ्या आणि तिसर्‍या दिवशी मिळून हजारचा टप्पा पार केला.मुळातच गरीब असलेलं हे कुटुंब किती स्वावलंबी आहे आणि महत्वाचं म्हणजे,लहान मुलांना आपल्या परिस्थितीची जाणीव आहे.असा मुलांमध्ये काहीतरी करून दाखवण्याची धमक असते.असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
Sister and brother sell ice cream to save their mother's life....
                          --------//--------
                   
                   मुख्य संपादक
                सै.मुम्ताज़ अली.
 मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या