Subscribe Us

header ads

ST bus and container Accident.एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात.

News@Korpanalive..
       एसटी बस आणि कंटेनरचा भीषण अपघात बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील पळसखेड चक्का,या गावाजवळ आज सकाळी अंदाजे 6 च्या सुमारास झाला.या अपघातात बसमधील 5 प्रवाशांचा मृत्यू झाला,तर 13 प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती आहे.5 passengers died,13 were seriously injured in a terrible accident.मेहकर आगाराची ही बस, पुण्यावरून मेहकरकडे येत असताना अपघात झाला.अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत असून जखमींना सिंदखेडराजा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.अपघातात एसटी बसचे प्रचंड नुकसान झाले असून बसचा समोरील भाग अक्षरशः चक्काचूर झाला आहे.विश्वसनिय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अपघाता नंतर संबंधित पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व बचावकार्य सुरू केले.मृतांमध्ये बस चालकाचाही समावेश आहे.जखमींमध्ये दुसरबीड येथील काही जणांचा समावेश असल्याची माहिती आहे.बातमी लिहिस्तोवर अपघातातील जखमीं बाबत सविस्तर माहिती मिळाली नाही.सदर भीषण अपघातामुळे मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूकही काही काळासाठी ठप्प झाली होती.त्यामुळे मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.पोलिसांनी काही वेळाने वाहतूक सुरळीत केली आणि वाहतूक पुर्वी प्रमाणे सुरू झाली.
Accident in Buldana District...
5 passengers died,13 were seriously injured in a terrible accident...
                       ---------//--------
                  
                 मुख्य संपादक
             सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या