Subscribe Us

header ads

ST Bus,Car Accident. एसटी बस आणि कारची भीषण धडक.

Nwes@Accident..
          एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना 4 एप्रिल रोजी सायंकाळी अंदाजे 5 च्या सुमारास कळमेश्वर तालुक्यातील धापेवाडा आदासा वळणावर घडली.Bus,Car Accident. या अपघातात कारमधील 3 जण गंभीर जखमी झाले.त्यांच्यावर प्राथमिक आरोग्य केंद्र धापेवाडा येथे उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात अल्याची माहिती आहे.भर रस्त्यात हा अपघात झाल्याने सावनेर-कळमेश्वर राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.सदर अपघात सावनेर पोलीस स्टेशन हद्दीत येत असल्याने अपघाताची माहिती मिळताच सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
            प्राप्त माहितीनुसार एसटी बस लोणारा गावावरून कळमेश्वर मार्गे आदासाकडे जात होती.त्याचवेळी कळमेश्वर वरून लग्न समारंभ आटपून सावनेरकडे स्विफ्ट डिझायर कार Swift Desire Car ने जात होते.दरम्यान,बस Bus आदासाकडे वळण घेत असताना बसच्या मागे असलेली कार बसला ओव्हरटेक Overtake करण्याच्या प्रयत्नात बसला धडकली.Car accident overtaking a Bus.या धडकेत कारच्या डाव्या बाजूचे मोठे नुकसान झाले असून जखमीमध्ये सावनेर येथील 1महिला,2 पुरूष यांचा समावेश आहे.कार चालक हा किरकोळ जखमी झाला असून सदर घटनेची पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहे.
Car Accident Overtaking a Bus...
                        -------//-------
                     
                 मुख्य संपादक
               सै.मूम्ताज़ अली.
  मो.9049358699,9595630811.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या