Subscribe Us

header ads

Temperature.विदर्भात उन्हाचा चटका असह्य..

News@Temperature..
    सूर्याचा ताप वाढल्याने विदर्भात उन्हाचा चटका असह्य होत चाललेला आहे.विदर्भात कमाल तापमानाचा पारा हंगामातील उच्चांकी पातळीवर असून,अकोला,अमरावतीसह चंद्रपूर व नागपुरात उष्णतेची लाट आली आहे.उन्हाचा ताप टिकून राहणार असून,कमाल तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.राज्यात उन्हाच्या वाढत्या झळा चांगल्याच तापदायक ठरत असल्याने उकाड्यातही वाढ झाले आहे.त्यामुळे अंगाची लाही-लाही होत असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
            विदर्भातील नागपूर,चंद्रपूर,ब्रम्हपुरी,वर्धा, अमरावती,अकोला येथे तापमान 42 अंशांच्या पुढे गेला आहे.उर्वरित राज्यात बहुतांश ठिकाणी तापमान 36 ते 44 अंशांच्या दरम्यान आहे.दक्षिण हरियाणात समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती निवळून गेली.राज्यात कमाल तापमानातील वाढ कायम राहण्या बरोबरच,उकाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरातील "मोचा” अति तीव्र चक्रीवादळ जमीनीवर येताच त्याची तीव्रता ओसरली आहे.सोमवारी सकाळी ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होते.दुपारनंतर वादळाचे कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे.
The body is getting lahi-lahi...
The temperature rises...
                         --------//-------
                       
                 मुख्य संपादक
           सैय्यद मुम्ताज़ अली.
 मो.9595630811,9049358699.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या