News@Road Work...
कोरपना तालुक्यात सर्वात मोठे व औद्योगिक शहर गडचांदूर येथील माणिकगड (अल्ट्राटेक) सिमेंट कंपनी गेटपासून गायत्री बेकरीपर्यंत जवळपास एक कोटीच्या सिमेंट रोडचे काम होत आहे.सदर काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची ओरड सुरू असून नगरपरिषदेच्या संबंधित विभाग अभियंत्याचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे आरोप नागरिकांकडून होत आहे.सदर रोडचे काम चंद्रपूर येथील एका कंत्राटदाराला देण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून शहरातील हा मुख्य रस्ता डांबरचा होता.मात्र आता याचे रूपांतर सिमेंटीकरणात होत आहे.राजुराचे आमदार सुभाष धोटे यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या निधीतून होत असलेल्या या कामाची देखरेख स्थानिक नगरपरिषदेकडे आहे.असे असताना संबंधित अभियंत्यांनी कामाची पाहणी व कामाच्या वेळी सदर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहणे गरजे आहे.मात्र, असे होताना दिसत नाही.परिणामी कंत्राटदाराची त्याठिकाणी मनमाने कारभार सुरू असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.वास्तविक पाहता सिमेंटीकरण करण्यापुर्वी गिट्टी टाकून त्यावर रोलर फिरवणे आवश्यक होते.मात्र असे न करता कंत्राटदार सरळ माती मिश्रीत गिट्टी टाकून,त्यावर सिमेंटीकरण करत असल्याचे दिसून येत आहे. सदर काम लोकांच्या नजरेत पडू नये यासाठी कंत्राटदार चक्क रात्रीच्या सुमारास रोडचे काम करण्याच्या तयारीत होता.मात्र,येथील काही सूज्ज्ञ नागरिकांनी विरोध केल्याने आता दिवसा रोड सिमेंटीकरणाचे काम करीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.The road work in Gadchandur is of very poor quality.

सदर कामाची प्रत्यक्षात पाहणी केली तर यामध्ये रेती,सिमेंटचे प्रमाण कमी आणि गिट्टीचे जास्त दिसत आहे.यामुळे कामाचं दर्जा काय ? हे वेगळं सांगायला नको.!जर याच पद्धतीने काम होत असेल तर रोड कितीकाळ टिकेल,हे सांगणे कठीण झाले आहे.तिकडे काहीपण असो,काही देणेघेणे नाही,फक्त चांगले व दर्जेदार काम व्हावे अशी अपेक्षा शहरवासीयांची असते,मात्र याठिकाणी सिमेंट रोडच्या नावाने केवळ पैशांची उधळपट्टी केली जात असल्याचे सनसनाटी आरोप नागरिकांकडून होताना दिसत आहे. शहरातील या मुख्य रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, यासाठी आता नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची विनंती वजा मागणी करण्यात आली असून अन्यथा नाईलाजास्तव आंदोलन उभारण्याची तयारी करावी लागेल,असे मत काही सामाजिक,राजकीय कार्यकर्त्यांनी "कोरपना Live" पुढे व्यक्त केले आहे. आता यासंदर्भात पुढे काय घडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The road work in Gadchandur is of very poor quality...
--------//-------

मुख्य संपादक
सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

0 टिप्पण्या