Subscribe Us

header ads

White money holders should not worry.पांढरा पैसा बाळगणाऱ्यांनी चिंता करु नये.

News@Note 2 Thousand...
 दोन हजारांच्या नोटा चलनातून काढून घेण्याच्या घोषणेचे जोरदार समर्थन करताना पांढरा पैसा बाळगणाऱ्यांना या निर्णयाची कोणतीही भीती नसल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस DCM Devendra Fadnavis on RBI Decision यांनी व्यक्त केले आहे.केंद्र सरकारच्या निर्णयावर विरोधकांनी टिकेची झोड उठविली असताना फडणवीस यांनी त्यामागील भूमिका स्पष्ट केली. दोन हजार रूपयांची नोट अजूनही कायदेशीर असून ती बेकायदेशीर ठरवण्यात आली नसल्याचे स्पष्ट करून फडणवीस म्हणाले की,रिझर्व्ह बँकेने 30 सप्टेंबरची मुदत दिली आहे.कायदेशीर नोटा असणाऱ्यांना तसेच पांढरा पैसा White money असणाऱ्यांना या निर्णयामुळे कोणतीही चिंता करण्याची गरज नाही.पण कुणी काळा पैसा जमा करून ठेवला असेल,तर त्याला मात्र तो बदलताना त्रास निश्चितच होणार आहे.त्याला एवढा पैसा कुठून आला ? हे स्पष्ट करावे लागेल,असे उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.पाकिस्तानच्या आयएसआय ISI कडून नेहमीच बनावट चलन आणण्याचा प्रयत्न केला जातो.त्यांचा हा प्रयत्न, अशा निर्णयांमुळे हाणून पाडला जातो.
White money holders should not worry....
                       -------//-------
                    
                मुख्य संपादक
            सैय्यद मुम्ताज़ अली.
  मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या