Subscribe Us

header ads

Women pocket maar in the area of ​​Gadchandur bus stand.गडचांदूर बसस्थानक परिसरात "पाकेट मार" महिलांचा हैदोस.

News@Women Pockit maar...
 कोरपना तालुक्यातील औद्योगिक शहर गडचांदूर येथील बसस्थानक परिसरात हल्ली पाकेट मार महिलांनी Women Pockit maar अक्षरशः हैदोस घातला असून गोरगरिबांना मोठ्याप्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावा लागत आहे. दररोज 3 ते 4 महिला बसमध्ये चढणाऱ्या महिला, पुरूष प्रवाशांच्या पैशांवर डल्ला मारत आहे.गेल्या आठवड्यात एका व्यक्तीचे 50 हजार,दोन दिवसापुर्वी 8 हजार,आज 8 मे रोजी दुपारी अंदाजे 1 च्या सुमारास एका गरीब महिलेच्या बॅगमधील 3 हजार रुपयांवर हात सफाई केली आहे.सदर महिला गडचांदूर ते पांढरकवडा येथे जात होती.दरम्यान आपल्या लहान मुली सोबत चंद्रपूर-अदिलाबाद Chandrapur-Adilabad
बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत तिच्या हँडबॅग Handbag मधून 3 हजार रूपयांवर यांनी हातसाफ केला.महिलेची आडचण लक्षात घेऊन बसस्थानक परिसरातील काही लोकांनी आर्थिक मदत करून त्या महिलेला दुसऱ्या बसने पाठवले. Women pocket maar in the area of ​​Gadchandur bus stand.
    बस स्टँड परिसरात महिला व पुरुष पोलीसांची नेमणूक करावी,यासाठी आजी-माजी नगराध्यक्षा, शेतकरी संघटना शहर सरचिटणीस संतोष पटकोटवार व इतरांनी ठाणेदार यांना निवेदन दिले मात्र यासंदर्भात सकारात्मक काही घडले नाही. लग्नसराई व शाळेला सुट्ट्या अल्याने नागरिक कुटुंबासह बाहेरगावी जात आहे.तसेच बसमध्ये महिलांना अर्धा तिकीट असल्यामुळे बसांमध्ये महिला प्रवाशांची गर्दी वाढली आहे.नेमका याचाच फायदा घेऊन हे पाकेट मार लोकांच्या पैशांवर डल्ला मारत आहे.आठवडी बाजाराच्या दिवशी तर महिलांसह पुरूष पाकेट मार सुद्धा शहरात येत असल्याचे कळते.पोलीस विभागाने याकडे लक्ष देऊन या पाकेट मारांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
Women pocket maar in the area of ​​Gadchandur bus stand.
                     --------//-------
                    
               मुख्य संपादक
             सै.मुम्ताज़ अली.
 मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या