News@राष्ट्रवादी काँग्रेस...
राष्ट्रवादी कांग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.याचे पडसाद इतर ठिकाणांसह चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातही उमटले आहे.याविषयी अनेक प्रतिक्रिया समोर येत असून एकीकडे पवार यांचा हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत वेदनादायी व नैराश्य निर्माण करणारा आहे तर दुसरीकडे या निर्णयामगे पवार यांची एखादी राजकीय खेळी तर नसेल ना ? अशी शंकाही व्यक्त होत आहे. Sharad Pawar's resignation.

शरद पवार यांनी राजीनामा परत घेऊन आजीवन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष रहावेत अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. "पवार साहेब वयाने निवृत्त असले तरी त्यांचे अध्यक्ष पदावर राहणे,हे युवा कार्यकर्त्यांना प्रेरणा व ऊर्जा देणारे असून त्यांच्या अनुभवाचा फायदा केवळ राकाँलाच नव्हे तर संपुर्ण देशाला आवश्यक असल्याचे मत व्यक्त करत कार्यकर्त्यांच्या भावना, संवेदनांचा विचार करून पवार साहेबांनी घेतलेला निवृत्ताचा निर्णय मागे घेऊन अध्यक्षपदावर कायम राहण्याची विनंती राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी मुनाज शेख यांनी केली आहे."
तर राष्ट्रवादीचे भद्रावती तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर यांनी पवार साहेबांचा अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय हा कार्यकत्यांसाठी शोकदायी असल्याचे मत व्यक्त करत पक्षाला आणि राज्याला पवार साहेबांच्या नेतृत्वाची अजूनही गरज असल्याचे मत व्यक्त करीत साहेबांनीच आजीवन अध्यक्षपदावर कायम रहावे असे म्हटले आहे.शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घ्यावा असा सुर येथील पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे.आता या सर्व कार्यकर्त्यांची भावना,संवेदना,विनंती शरद पवार मान्य करतील का ? ते राजीनामा परत घेऊन अध्यक्षपदावर कायम राहतील का ? हे आता येणारा काळच ठरवेल.
यावेळी राष्ट्रवादी कांग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी तथा युवा नेते मुनाज शेख,तालुकाध्यक्ष सुधाकर रोहणकर,विलास नेरकर,युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी चंद्रपूर जिल्हाध्यक्ष फय्याज शेख,सुनील महाले,प्रा.राजेंद्र ताजने,रोशन कोमरेड्डीवार,अमोल बडगे,अजय कावळे,प्रमोद वावरे,राकेश किनेकर, ओमकार पांडे आदींची उपस्थिती होती.
Workers demand that Pawar should be the president...
---------//--------

मुख्य संपादक
सै.मूम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.0

0 टिप्पण्या