Subscribe Us

header ads

वरोऱ्यात भर दिवसा युवकाची हत्या Youth killed in broad daylight in Warora.

News@Crime..
         चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील विकास नगर येथे 20 मे शनिवार रोजी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास एका तरूणाची हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. Youth Killed in broad daylight in Warora. रितेश लोहकरे वयवर्ष अंदाजे 20, राहणार विकास नगर,हा एका महाविद्यालयात शिक्षण घेत होता.घटनेच्या दिवशी सकाळी अंदाजे 9 च्या सुमारास त्याला एका मित्राने फोन करून त्याच्या घरा जवळील पान शॉवर बोलावले. तिथे काही तरूण आधीच रितेशची वाट बघत होते.रितेश आणि त्या तरूणांमध्ये बाचाबाची झाली.दरम्यान त्यांनी रितेशवर काठीने हल्ला चढवला.त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी शेखर देशमुख,पोलीस निरीक्षक अमोल काचोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह तातडीने वरोरा उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.रितेशच्या मारणाऱ्यांना काही व्यक्तींनी बघितले असून सदर व्यक्तींचा शोध घेणं सुरू आहे.लवकरच मारेकऱ्यांना अटक करण्यात येईल.सदर हत्या प्रेम प्रकरणातून झाल्याचा संशय असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली आहे.दरम्यान जिल्हा पोलीस अधीक्षक परदेशी Chandrapur District Superintendent of Police Pardeshi यांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन सदर घटनेची माहिती घेतली.
Youth killed in broad daylight in Warora...
                        --------//--------
                       
                 मुख्य संपादक
             सैय्यद मुम्ताज़ अली.
मो.9595630811,9049358699.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या